औरंगाबाद -सोमवारी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस शहराच्या पाणी प्रश्नावर आंदोलन करणार आहे. मात्र शनिवारी 21 मे रोजी राष्ट्रवादीने पाण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या आधी शहरातील पाणी प्रश्नावरून आरोप प्रत्यारोप वाढणार असे दिसून येत आहे. पुंडलिक नगर भागात राष्ट्रवादी ( NCP agitation in Pundalik Nagar area Aurangabad ) कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले. भाजपा नेते अतुल सावे यांच्या विरोधात त्यांच्याच मतदार संघात आंदोलन करण्यात आले. शिवाजी महाराज पुतळा ते पाण्याच्या टाकीपर्यंत भाजपा विरोधात घोषणाबाजी ( Proclamation and Ghagar agitation against BJP )करत आंदोलन काढण्यात आले. डोक्यावर रिकाम्या मातीच्या घागरी घेऊन आंदोलन केल्यानंतर पाण्याच्या घागरी फोडून पाणी समस्याबाबत आक्रोश व्यक्त करण्यात आला.
NCP Ghagar Agitation Aurangabad : भाजपाच्या आंदोलनापूर्वीच राष्ट्रवादीचे 'घागर आंदोलन'
पुंडलिक नगर भागात राष्ट्रवादी ( NCP agitation in Pundalik Nagar area Aurangabad ) कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले. भाजपा नेते अतुल सावे यांच्या विरोधात त्यांच्याच मतदार संघात आंदोलन करण्यात आले. शिवाजी महाराज पुतळा ते पाण्याच्या टाकीपर्यंत भाजपा विरोधात घोषणाबाजी ( Proclamation and Ghagar agitation against BJP )करत आंदोलन काढण्यात आले. डोक्यावर रिकाम्या मातीच्या घागरी घेऊन आंदोलन केल्यानंतर पाण्याच्या घागरी फोडून पाणी समस्याबाबत आक्रोश व्यक्त करण्यात आला.
भाजपा विरोधात आंदोलन :भाजपा तर्फे शहराच्या पाणी प्रश्नावर सोमवारी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र गेल्या तीस वर्षांमध्ये शिवसेनेसोबत महानगर पालिकेत सत्ता उपभोगत असताना, पाण्याच्या परिस्थितीवर कधी आवाज उठवला नाही. मग आता आंदोलन करण्याचा अधिकार यांना राहिला नाही, असे म्हणत भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आले. गेली आठ वर्षे अतुल सावे पूर्व मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तरी या भागात पाणी समस्या असल्यांने ती निष्क्रिय आमदार असून त्यांच्या कार्यालयावर मोर्चा जाणार असल्याने ते कार्यालयातून पळून गेले, असा आरोप राष्ट्रवादीचे स्थानिक नेते माणिक शिंदे यांनी केला.
हेही वाचा -आताही राजीनामा घेतला नाही.. सध्या पवार बोले शिवसेना चाले अशी स्थिती - भाजप नेते चंद्रकांत पाटील