महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना धमकी

ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध करण्यासाठी मराठवाडा साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांना धमक्या मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

मराठवाडा साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील

By

Published : Sep 25, 2019, 2:48 PM IST

औरंगाबाद - उस्मानाबाद येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली. यानंतर त्यांच्या निवडीला विरोध करण्यासाठी मराठवाडा साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांना धमक्या मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात महामंडळ अद्याप कोणतीही तक्रार देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.

दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध करण्यासाठी मराठवाडा साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांना धमक्या मिळत आहेत.

ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिश्चन धर्मीय असून, काही लोक त्यांना साहित्यिक समजत नसल्याने विरोध होत आहे, असे कौतीकराव ठाले पाटील यांनी सांगितले. तसेच अध्यक्ष बदलण्याची मागणी होत असली, तरीही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा फ्रान्सिस दिब्रिटोंचे साहित्य निधर्मीय - श्रीपाल सबनीस

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे साहित्यिक असून, त्यांच्याकडे साहित्यिक म्हणूनच पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच सरकारने मराठी पाठ्य पुस्तक मंडळाच्या सदस्यांमध्ये त्यांची निवड केली आहे. सरकारने केलेली निवड चालते; आमची निवड का चालत नाही? असा प्रश्न मराठवाडा साहित्य परिषदचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
एखाद्या आमदार किंवा खासदाराची निवड केल्यावर काही लोकांच्या सांगण्यावरून ती रद्द करता येत नाही; तसेच आम्ही केलेली निवड रद्द करता येणार नाही, असे कौतीकराव ठाले म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details