औरंगाबाद - 10 जुलैपासून शहरात जनता कर्फ्यू लावण्यात येणार असून यामुळे उद्योग देखील सहभागी होणार आहेत. मात्र उद्योजकांनी यावर नाराजी व्यक्त केलीय. 'आज जरी आम्ही 'बंद'मध्ये सहभागी असलो, तरीही भविष्यातील शाश्वती नाही', अशी भूमिका उद्योजक राम भोगले यांनी मांडली आहे.
'आज बंद स्वीकारला, तरीही भविष्यातील शाश्वती नाही'; उद्योजकांमध्ये नाराजी
10 जुलैपासून शहरात जनता कर्फ्यू लावण्यात येणार असून यामुळे उद्योग देखील सहभागी होणार आहेत. मात्र उद्योजकांनी यावर नाराजी व्यक्त केलीय. 'आज जरी आम्ही 'बंद'मध्ये सहभागी असलो, तरीही भविष्यातील शाश्वती नाही', अशी भूमिका उद्योजक राम भोगले यांनी मांडली आहे.
'आज जरी आम्ही 'बंद'मध्ये सहभागी असलो, तरीही भविष्यातील शाश्वती नाही', अशी भूमिका उद्योजक राम भोगले यांनी मांडली आहे.
आज 'बंद'ची गरज असल्याचे मान्य करुन आम्ही सहभागी होत आहोत, असे ते म्हणाले. आम्ही सोबत आहोत त्यामुळे आता जी काही व्यवस्था करावी लागणार आहे ती व्यवस्था प्रशासनाने करावी. त्यात कुठे कमी पडू नये. उद्योग सुरू राहण्यासाठी धडपड सुरू असून उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.