महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Guler competition औरंगाबाद शहरात रंगली गुलेर स्पर्धा, वेगवेगळ्या राज्यांमधून आले स्पर्धक

गुलेर खेळणे म्हणजे काहीतरी खोडी करणे किंवा प्राण्यांना, पक्षांना हकलण्यासाठी वापरण्यात येते असा समज सहसा सर्वसामान्यांचा असतो. ( Guler Competition ) मात्र, जिल्ह्यात चक्क गुलेर खेळण्याची राष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात आली आहे. तब्बल १२० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 30, 2022, 5:57 PM IST

औरंगाबाद - गुलेर हातात घेऊन जाणाऱ्याकडे पाहणाऱ्यांची नजर सहसा संशयित असते. मात्र, गुलेरला प्राचीन इतिहास आहे. पुराणात कृष्णाच्या जीवनावर आधारित कथा ऐकताना भगवान कृष्ण गुलेरद्वारे मटकी फोडून लोणी चोरून खात असतात, असा उल्लेख आहे. तर काही युद्धांमधे शत्रूला अडवण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी या गुलेरचा वापर केला जात होता. ( Guler Competition Was Held In Aurangabad City ) तर कालांतराने प्राण्यांना किंवा पक्षांना मारण्यासाठी गुलेरचा वापर करत असल्याचे दिसून येत होते. परिणामी गुलेर वापरावर काही निर्बंध लावण्यात आले. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये गुलेर खेळ म्हणून खेळला जाऊ लागला.

औरंगाबाद शहरात रंगली गुलेर स्पर्धा

राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन -सिडको येथील सप्तपदी मंगल कार्यालय येथे गुलेर खेळण्याची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विविध राज्यांमधून १२० खेळाडू सहभागी झाले आहेत. यामधे महिला खेळाडूंचा सहभाग देखील होता. ( Guler Competition 2022 ) १० मीटर ते ३० मीटर अंतरापर्यंत खेळाडूंच्या वयानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २०१८ मधे गुलेर खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी भारताकडून संघ इटलीला गेला होता. लवकरच चायना येथे दुसऱ्या जागतिक स्पर्धेत संघ सहभागी होणार आहे. ऑलिंपिक खेळामध्ये गुलेर खेळाचा सहभाग शूटिंग प्रकारात व्हावा यासाठी प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील तीन ते चार वर्षात हा खेळ देखील ऑलम्पिक मध्ये खेळला जाईल. अशी माहिती राष्ट्रीय गुलेर संघटनेचे सचिव लवकुमार जाधव यांनी दिली.

खेळासाठी करावे लागतात कष्ट -तेर खेळणे हा सोपा वाटणारा खेळ प्रकार असला तरी त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आपलं लक्ष केंद्रित राहावं यासाठी रोज सकाळी दीड ते दोन तास ध्यान धारणा करावी लागते. आपलं लक्ष केंद्रित असलं तर लक्ष गाठणं सोपं होतं. त्यानंतर अचूक नेम गुलरच्या माध्यमातून लागावा यासाठी एक ते दीड तास रोज गुलर सोबत सराव करावा लागतो. त्यानंतर सोप्या पद्धतीने हा खेळ खेळणं शक्य होतं. अनेक वेळा गुलेर या प्रकारात सहभाग घेत असल्याने मित्र नातेवाईक नाव ठेवतात अशी ही माहिती खेळाडूंनी दिली. मात्र आपला प्राचीन खेळ असून कोणी काय म्हणत त्यापेक्षा आपण या प्रकारात राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं काम करू शकतो याकडे लक्ष देऊन सराव करत असल्याचे मत खेळाडूंनी व्यक्त केले.

हेही वाचा -Prithviraj Chavan Meet Gulab Nabi Azad काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली गुलाब नबी आझादांची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details