महाराष्ट्र

maharashtra

Durlabh Kashyaps craze : उज्जैनच्या गुन्हेगार दुर्लभ कश्यपची शहरातील तरुणांमध्ये क्रेझ; कारवाईची मागणी

शांत असलेल्या औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, मारामाऱ्या, सोनसाखळी चोरी, लुटमार यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली ( criminal cases increasing in Aurangabad ) आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे गुन्हे करण्यात १८ ते ३० वर्ष वयोगटातील तरुणांचा सहभाग अधिक असल्याचे दिसून येतो. याच वयोगटातील तरुण आता उज्जैन येथील कुख्यात गुन्हेगार दुर्लभ कश्यप याचे ( Durlabh Kashyap craze in Aurangabad ) अनुकरण करताना दिसत आहेत.

By

Published : Feb 19, 2022, 9:40 PM IST

Published : Feb 19, 2022, 9:40 PM IST

दुर्लभ कश्यप
दुर्लभ कश्यप

औरंगाबाद - अल्पवयात गुन्हेगारी विश्वास दहशत निर्माण करणाऱ्या उज्जैनच्या कुख्यात गँगस्टर दुर्लभ कश्यपची शहरातील तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. दहशत पसरवण्यासाठी तरुण त्याचे अनुकरण करताना पाहायला मिळत आहेत. यामुळे शहरात दुसरा दुर्लभ कश्यप व त्याची टोळी तर सक्रिय होत नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शांत असलेल्या औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, मारामाऱ्या, सोनसाखळी चोरी, लुटमार यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली ( criminal cases increasing in Aurangabad ) आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे गुन्हे करण्यात १८ ते ३० वर्ष वयोगटातील तरुणांचा सहभाग अधिक असल्याचे दिसून येतो. याच वयोगटातील तरुण आता उज्जैन येथील कुख्यात गुन्हेगार दुर्लभ कश्यप याचे ( Durlabh Kashyap craze in Aurangabad ) अनुकरण करताना दिसत आहेत.


हेही वाचा-Hindustani Bhau Released Jail : हिंदुस्तानी भाऊची जेलमधून सुटका; म्हणाला "मी बाळासाहेबांचा..."

कोण आहे उज्जैनचा डॉन?
मध्ये प्रदेश राज्यातील उज्जैन जिल्ह्यातील दुर्लभ मनोज कश्यप असे कुख्यात गुंडाचे नाव आहे. दुर्लभ हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असून आई शिक्षिका तर वडील व्यापारी आहेत. दुर्लभला वयाच्या सोळाव्या वर्षी डॉन बनायचे होते. यामुळे त्याने खून, मारामाऱ्या, हप्ता वसुली तसेच फेसबुकच्या माध्यमातून सुपाऱ्या घ्यायला त्याने सुरुवात केली. सोशल मीडियावर हत्यारासह व्हायरल होणारे त्याचे फोटो व्हिडिओ पाहून तरुण त्याच्याशी जोडले जाऊ लागले. यातून उज्जैनमध्ये त्याची मोठी टोळी सक्रिय झाली होती.

हेही वाचा-Mumbai Corona Update : दिलासादायक! मुंबईत आज २०१ नव्या कोरोना रुग्ण, तर एका रुग्णांचा मृत्यू

टोळीची विशेष ओळख...
मध्येप्रदेशातील उज्जैनमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीची विशेष ओळख आहे. टोळीची दिसताच ओळख व्हावी यासाठी त्याने स्वतःची एक स्टाईल तयार केली आहे. यात कपाळावर लाल कुंकू, डोळ्यात काजळ आणि खांद्यावर कळ्या रंगाचा त्याला सोनेरी रंगाची बॉर्डर असलेला रुमाल अशी कश्यपच्या टोळीची ओळख आहे. टोळीतील प्रत्येक सदस्य याच स्टाईलमध्ये असतात.

हेही वाचा-Charged Against Police Officers : तीन पोलीस अधिकाऱ्यांवरच खंडणीचा गुन्हा दाखल

फेसबुक पेजवर करतात जाहिरात
दुर्लभ कश्यप याने दहशत निर्माण करण्यासाठी स्वतःच्या फेसबुक फेजवर पोस्ट करत जाहिरात केली आहे. कोणताही वादविवाद असल्यास संपर्क करा, असे आवाहन केले. त्याची सोशल मीडिया चालवण्यासाठी टीम काम करत होती. या पेजवर तुरुंगामध्ये असलेल्या कुख्यात गुन्हेगारांचे फोटो अपलोड केले जात होते.

गँग वॉरमध्ये कश्यपचा खून.
दुर्लभ कश्यप याने उज्जैन येथे मारामाऱ्या, खून यासारखे गुन्हे केल्याने त्याने अनेकांबरोबर शत्रुत्व केले होते. त्यातच त्याला पोलिसांनी जेरबंद केले. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने त्याला तू जेलमध्येच सुरक्षित आहेस, असा सल्ला दिला होता. तुरुंगातून बाहेर पडला तर तुला तुझे शत्रू मारून टाकतील, असे देखील सांगितले होते. यामुळे दुर्लभ याने तुरुंगामधून जामिन घेतला नव्हती. मात्र कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अनेक कैद्यांना सोडण्यात आले. यात दुर्लभदेखील बाहेर आला. काही दिवसांनी मित्रांसोबत घरी जेवण करून तो चहा घेण्यासाठी बाहेर आला. यावेळी शाहनवाजच्या टोळीतील सदस्यदेखील तिथे आले होते. काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी दुर्लभने एकावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. यावेळी समोरच्या टोळीने चाकूने वार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात दुर्लभचे सहकारी पळून गेले. यात ३४ वेळा चाकू लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दुर्लभचा मृत्यू झाला.

गुन्हे शाखेने शोधून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे....
शहरातील प्रत्येक भागामध्ये गुन्हेगार दुर्लभ कश्यपचे अनुकरण करणारे तरुण पाहायला मिळत आहेत. या तरुणांच्या माध्यमातून शहरात दहशत पसरवण्याचे काम केले जात आहे. गुन्हे शाखेने अशा गुन्हेगारांना शोधून काढावे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत पसरविणाऱ्यांना वेळीच जागा दाखवली तर भविष्यात गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रीय होणार नाहीत. त्यासोबतच शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही, असेदेखील निवृत्त पोलीस अधिकारी नरेश मेघराजन यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details