महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Agneepath Yojana अग्निपथ योजनेत भरतीसाठी आलेल्या युवकाचा मृत्यू

भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत Aurangabad Agneepath Yojana औरंगाबाद येथे गेलेला विठ्ठलवाडी ता. कन्नड येथील तरुण करण नामदेव पवार (वय 21) Karan Namdev Pawar हा काल रात्री 12 वाजता शेवटचा ग्राऊंड काढत असताना चक्कर येऊन पडल्याने त्याला शासकीय रुग्णालय औरंगाबाद Government Hospital Aurangabad येथे दाखल केले होते. त्याच्यावर उपचार चालू असताना आज दुपारी त्याचे औरंगाबाद येथे निधन झाले.

By

Published : Aug 18, 2022, 5:44 PM IST

Aurangabad Agneepath Yojana
अग्निपथ योजनेत भरती

औरंगाबाद अग्निपथ योजनेंतर्गत, Aurangabad Agneepath Yojana भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी औरंगाबाद येथे गेलेला विठ्ठलवाडी ता. कन्नड येथील तरुण करण नामदेव पवार (वय 21) Karan Namdev Pawar हा काल रात्री 12 वाजता शेवटचा ग्राऊंड काढत असताना चक्कर येऊन पडल्याने त्याला शासकीय रुग्णालय औरंगाबाद येथे दाखल Government Hospital Aurangabad केले होते. त्याच्यावर उपचार चालू असताना आज दुपारी त्याचे औरंगाबाद येथे निधन झाले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर परीक्षा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्य दलाच्या अग्निवीर भरती सुरू आहे. यासाठी कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील 21 वर्षीय तरून करण नामदेव पवारदेखील भरतीसाठी आला होता. बुधवारी रात्री 10 वाजता शेवटचा ग्राऊंड काढत असताना करण चक्कर येऊन पडला. त्यामुळे त्याला लागलीच शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल करण्यात आले. दरम्य़ान, उपचार सुरू असताना आज दुपारी त्याचा मृत्यू झाला.

पार्किंग, निवारा, नाश्ता, पाणी, स्वच्छतागृहाचा अभावविद्युत काॅलनीतून भरतीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.पार्किंगची व्यवस्था नसल्याने भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मैदानी चाचणी पास केलेल्या विद्यार्थ्यांना दिवसभर नाश्ता, जेवणाची व्यवस्था पुरेशी नव्हती. अन्नदान व विद्यार्थ्यांना मदत करू इच्छिणाऱ्यांना आतमध्ये जाण्यास परवानगी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहचण्यात अडचणी येत होत्या. या सर्व कारणाने या गोष्टी विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणाऱ्या आहेत.

हेही वाचा Devendra Fadnavis हरिहरेश्वरमधील संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details