औरंगाबाद : राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती ( Recruitment for 7500 posts of police ) करणार येणार असून, लवकरच सर्व विभागांच्या ८० हजार नोकर ( 80000 Employees of all Departments Recruitment ) भरती करण्यात येईल. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. औरंगाबाद शहरातील टी.व्ही.सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी ( CM Eknath Shinde Visit to Aurangabad ) केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा औरंगाबाद दौरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी सिल्लोड येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून मुख्यमंत्री सायंकाळी शहरात परतले. त्यांनी शहराच्या विविध भागांतील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ज्यामधे त्यांनी क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, भडकल गेट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर समर्थक आमदार प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट यांच्या कार्यालयात भेट देत नागरिकांशी संवाद साधला.
प्रवाहाच्या विरोधात लढलो :आम्ही जी लढाई लढलो ती सोपी नव्हती. एका विचाराची लढाई लढलो, आम्ही मंत्री होतो तरी त्यावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडलो. ऐतिहासिक क्रांती म्हणून या घटनेकडे पहिले गेले. ३३ पेक्षा जास्त देशांनी ही घटना पाहिली. नवीन नवीन उपमा, टोपण नाव दिले, पण आम्ही घाबरलो नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत घाबरलो नाही. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचे धाडस केले. बाळासाहेबांचे विचार संपवण्याचा घाट घालण्यात येत होता.