महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये न्यायालयीन निर्णयानंतर फटाके फोडून जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

अयोध्या विवादावरील न्यायालयीन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद शहर पोलिसांनी शहरात पाच आणि पाच पेक्षा अधिक नागरिक जमण्यास व स्फोटक पदार्थ बाळगण्यास, ते फोडण्यास मनाई केली होती.

औरंगाबाद

By

Published : Nov 9, 2019, 5:40 PM IST

Updated : Nov 9, 2019, 6:53 PM IST

औरंगाबाद - प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून रामजन्मभूमीच्या विवादावर न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर फटाके वाजवून जल्लोष करणाऱ्या 6 ते 7 जणांना औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तम मुळूख - पोलीस निरीक्षक, क्रांति चौक पोलीस स्टेशन

हेही वाचा -वादग्रस्त जमीन रामल्लाचीच; मुस्लीम पक्षकारांना पर्यायी जागा मिळणार

अयोध्या विवादावरील न्यायालयीन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद शहर पोलिसांनी शहरात पाच आणि पाच पेक्षा अधिक नागरिक जमण्यास व स्फोटक पदार्थ बाळगण्यास, ते फोडण्यास मनाई करण्यात आली होती. असे असतानाही आज न्यायालयीन निर्णयानंतर नागेश्वरवाडी भागात काही जणांनी फटाके फोडले व जल्लोष करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. मात्र, तोपर्यंत जल्लोष करणारे निघून गेले होते. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अज्ञात 6 ते 7 जाणांविरोधात प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना फटाके फोडले, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Nov 9, 2019, 6:53 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details