अमरावती : सध्या राज्याचे असलेले गृहमंत्री हे हतबल झाले आहे.ते हातपाय बांधलेले गृहमंत्री असून प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करावी लागते त्यामुळे त्यांचे गृहखात्यावर नियंत्रण नाही अशी टीका भाजप नेते अनिल बोंडें यांनी केली आहे. भाजप नेते अनिल बोंडें हे खोट बोलत असल्याची टिका राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab malik) यांनी केली होती. त्या टिकेलाही आज अनिल बोंडें यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.मी माझ्या ट्विटवर ठाम आहे.मी कधीच नवाब मलिक यांच्यासारख गांजा ,दारू पिऊन बोलत नाही अशी जहरी टीकाही अनिल बोंडें (Anil bonde) यांनी केली आहे.
राज्याचे गृहमंत्री हे हतबल आणि ..... हे म्हणत भाजप नेते अनिल बोंडेंंचा सरकारवर निशाणा
गुजरातमधील गोदरा हत्याकांड हे नरेंद्र मोदी यांनी चांगल्या पध्दतीने हाताळले होते. त्यानंतर तेथे एकही दंगल झाली नाही. फडणवीस सरकार यांच्या काळातही एकही दंगल झाली नाही.परंतु जिथे डाव्या विचारसरणीचे सत्ताधारी असतात. तेथे दंगल होत असल्याचेही डॉ अनिल बोंडें (Anil bonde) म्हणाले.
भाजप सरकारच्या राज्यात दंगली होत नाही
गुजरातमधील गोदरा हत्याकांड हे नरेंद्र मोदी यांनी चांगल्या पध्दतीने हाताळले होते. त्यानंतर तेथे एकही दंगल झाली नाही. फडणवीस सरकार यांच्या काळातही एकही दंगल झाली नाही.परंतु जिथे डाव्या विचारसरणीचे सत्ताधारी असतात. तेथे दंगल होत असल्याचेही डॉ अनिल बोंडें म्हणाले. भाजप सरकारने कधीच गुन्हेगारांची गय केली नाही.
संपूर्ण अमरावतीत संचार बंदीची गरज नाही
सध्या अमरावतीमध्ये संचार बंदी लावण्यात आली आहे. परंतु पूर्ण शहरात संचार बंदीची गरम नाही आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेंतमाल कुठे विकावा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पालकमंत्र्यांनी त्यांच्या गृहखात्याकडून तपास करावा
अमरावती मधील दंगल ही पूर्वनियोजित कट असल्याचं मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं होतं. त्यावर आज बोंडें यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.जर पालकमंत्र्यांना वाटत आहे ही दंगल पूर्वनियोजित आहे तर त्यांनी याची गृहखात्याकडून चौकशी करावी.
हेही वाचा -Dubai tour : राज्य आर्थिक संकटात, अर्ध्या डझन मंत्र्यांना दुबई वारीचे वेध