अमरावती -कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने छिदवाडी येथील सेजल जाधव या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. लेकीच्या अशा अचानक निघून जाण्याने उध्वस्त झालेल्या जाधव कुटुंबाला महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आधार दिला. श्रीमती ठाकूर यांनी सेजलच्या भाऊ-बहिणीला शिक्षणासाठी दत्तक घेतले असून, जाधव कुटुंबाला तातडीची आर्थिक मदतही केली आहे.
कोरोना आणि महागाईला कंटाळून जीवन संपवू नका - यशोमती ठाकूर
तिवसा तालुक्यातील छिदवाडी येथील सेजल जाधव या 17 वर्षीय विद्यार्थिनीने कुटुंबावरील कर्ज, नापिकी, हलाखीची परिस्थिती यामुळे तणावात येऊन आत्महत्या केली. यशोमती ठाकूर यांनी सेजलच्या भाऊ- बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली, आणि 10 हजार रूपयांची आर्थिक मदतही दिली.
यशोमती ठाकूर
प्रशासनलाही दिले आदेश
जाधव कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहू. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाच्या वतीने मदत मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. अशा घटना घडू नयेत म्हणून प्रभावी व सातत्यपूर्ण समुपदेशन यंत्रणा उभारण्यासाठीही प्रयत्न करू. या अनुषंगाने प्रशासनानेही आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.