महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुर्ण शुल्क न भरल्याने दहावीच्या विद्यार्थ्याच्या टक्केवारीत कपात, अमरावती महर्षी पब्लिक शाळेतील प्रकार

पूर्ण शुल्क शाळेत भरले नाही म्हणून, एका दहावीच्या विद्यार्थ्याला केवळ मूल्यांकनाच्या आधारे ५२% टक्के मार्क मिळाले आहेत. यावर पालक आण विद्यार्थ्याने आपली खंत व्यक्त केली आहे. हा प्रकार अमरावती येथील पब्लिक महर्षी स्कुलमध्ये समोर आला आहे.

By

Published : Aug 5, 2021, 6:15 PM IST

पुर्ण शुल्क भरल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत कपात, अमरावती महर्षी पब्लिक शाळेतील प्रकार
पुर्ण शुल्क भरल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत कपात, अमरावती महर्षी पब्लिक शाळेतील प्रकार

अमरावती - दहावीच्या वर्षाचे पूर्ण शुल्क शाळेत भरले नाही म्हणून, एका दहावीच्या विद्यार्थ्याला केवळ मूल्यांकनाच्या आधारे ५२% टक्के मार्क मिळाले आहेत. यावर पालक आण विद्यार्थ्याने आपली खंत व्यक्त केली आहे. हा प्रकार अमरावती येथील पब्लिक महर्षी स्कुलमध्ये समोर आला आहे.

पुर्ण शुल्क भरल्याने दहावीच्या विद्यार्थ्याच्या टक्केवारीत कपात, याबाबत आपली खंत व्यक्त करताना पालक आणि विद्यार्थी

'पैसे घ्या पण आमच्या मुलाची टक्केवारी वाढवून द्या अशी म्हणण्याची वेळ'

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसळा गावातील सामान्य कुटूंबातील आदित्य अविनाश काळमेघ ही विद्यार्थी यंदा अमरावतीच्या नामांकित अशा महर्षी पब्लिक स्कुलमध्ये दहावीला होता. त्यासाठी शाळेचे शुल्क 31 हजार रूपये भरणे गरजेचे होते. पण, कोरोनामुळे आदित्यच्या वडिलांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे ते शुक्ल भरू शकले नाहीत. परंतु जुळवा-जुळव करून त्यांनी 2300 रुपये परीक्षा फी भरली होती. परंतु, शाळेची पुर्ण फी न भरल्यामुळे या विद्यार्थ्याच्या टक्केवारीत मोठी कपात करून केवळ आकसापोटी या शाळेने केवळ ५२ टक्के मार्क दिल्याचा आरोप या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

'मुद्दामहुन केवळ 52% टके गुण टाकले'

आदित्य हा पाचवीपासून अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कुल या शाळेत शिकत होता. दरवर्षी त्याच्या पालकांनी शाळेची पूर्ण फीही भरली आहे. मात्र, कोरोनामुळे त्यांना फी भरणे कठीण झाले आहे. आदित्यला वर्ग सातवीत ८१%, वर्ग आठवीत 83% तर, वर्ग नववीत 81% टक्के गुण मिळाले असताना, आता दहावीत फक्त 52% गुण आमच्या मुलाला कसे असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. या वर्षी मूल्यांकन पद्धतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात आला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना सर्वाधिक टक्केवारी देखील मिळाली आहे. असे, असताना आदित्यला मुद्दामहुन केवळ 52% टके गुण टाकल्याचा अजब प्रकार अमरावती शहरातील या पब्लीक स्कुलने केल्याचा आरोप पालकांनी आणि मुलांनी केला आहे.

'शाळा प्रशासन गप्प'

आता विद्यार्थ्यांला कुठे प्रवेश मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, संतप्त झालेल्या पालकांनी शाळेत धडक देऊन शाळा प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाळा प्रशासन मात्र, या गंभीर विषयावर मुक गिळून गप्प बसले आहे. एकीकडे कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे आधीच नुकसान झाले आहे. त्यामध्ये या शाळेच्या मनमानीमुळे विद्यार्थी मात्र नैराश्यात गेले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांला न्याय देऊन मनमानी करनाऱ्या या शाळेवर कारवाईची मागणी केली जात आहे.

'रोजगार गेल्याने एका वेळेस फी भरणे शक्य नव्हते'

शाळेची फी मोठी असल्याने, आणि कोरोणामुळे रोजगार गेल्याने एका वेळेस फी भरणे शक्य नव्हते. त्यासाठी त्यांनी टप्प्या-टप्प्यात फी भरण्याची सवलत देण्याची मागणी, ही शाळा प्रशासनाला केली होती. परंतु, शाळा प्रशासनाने ते मान्य केले नसल्याचा आरोपही आदित्यचे वडील अविनाश काळमेघ यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details