अमरावती - राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या. आता गावागावात सरपंच निवडीला सुरुवात झाली आहे. गावचा सरपंच म्हणजे चांगला अनुभवी व्यक्ती, राजकारणात मुरलेला असावा, त्याचं वय त्याची प्रतिष्ठा हे सर्व बघितल्या जात असते. तरी अमरावती जिल्ह्यातील शिराळा या १८ हजार लोकवस्तीच्या गावाचा गाढा २३ वर्षाची उच्च शिक्षित असलेली अंकिता मिलींद तायडे ही तरुणी हाकणार आहे. नुकतीच तिची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
शिराळा गावात अवघ्या २३ वर्षाच्या अंकिताला सरपंचपदाची खुर्ची मिळाली असल्याने तिचे कौतुक केले जात आहे. पुढील पाच वर्षात माझं गाव आदर्श कसं होईल. याकडे भर देणार असल्याचे तिने सांगितले.
२३ वर्षाच्या तरुणीची सरपंचपदीबिनविरोधनिवड-
अमरावती जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडल्या आता सरपंच पदासाठी निवड सुरू झाली आहे. त्यामुळे गावागावात गटातटाचे राजकारण सुरू आहे. त्यासाठी गावातल्या गाव पुढार्यांनी राजकीय खेळी खेळायला सुरवात केली आहे. आपल्या गटाचा सरपंच कसा होईल, ग्रामपंचायत वर आपला झेंडा कसा फडकेल, यासाठी गावपुढाऱ्यांची कसोटी लागली असतानाच शिराळा गावातील अंकिता मिलिंद तायडे या २३ वर्षाच्या तरुणीची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
अमरावती शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर वर शिराळा गाव आहे. या गावची लोकसंख्या १८ हजार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतमध्ये एकूण १७ सदस्य आहेत. यावर्षी या ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती जमाती साठी निघाले होते. त्यामुळे अंकिता तायडे हिची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
गाव आदर्श बनवण्याचा मानस-
अंकिता तायडे ही उच्चशिक्षित असून तिचे शिक्षण एमएससी झाले आहे. त्यामुळे माझं शिक्षण माझ्या गावाच्या विकासासाठी नक्कीच कामी येईल. माझं शिक्षण पाहून गावातील लोकांनी मला निवडून दिले आहे. माझ्याकडूनही त्यांना भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून माझं शिराळा गाव कस आदर्श होईल, महाराष्ट्रात माझ्या गावाला एक वेगळी ओळख कशी मिळेल, यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याच नवनिर्वाचित सरपंच अंकीता तायडे यांनी सांगितले.
महिलांकडे देणार विशेष लक्ष-