महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अमरावतीतील राजकमल चौकातील दहीहंडी रद्द

गेल्या पंधरा वर्षांपासून अमरावती शहरात राजकमल चौकात नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने साजरा केला जाणारा दहिहंडी उत्सव यावर्षी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रद्द करण्यात आला आहे. दहीहंडीसाठी जमा होणारी रक्कम पूरग्रस्तांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

By

Published : Aug 23, 2019, 8:32 AM IST

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अमरावतीतील राजकमल चौकातील दहीहंडी रद्द

अमरावती - शहराच्या राजकमल चौकात नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून दहिहंडी उत्सव अमरावती साजरा केला जात आहे. मात्र, यावर्षी हा उत्सव यावर्षी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रद्द करण्यात आला आहे. दहीहंडीसाठी जमा होणारी रक्कम पूरग्रस्तांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने साजरा केला जाणारा दहिहंडी उत्सव यावर्षी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रद्द
नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी राज्यात कोल्हापूर आणि सांगली येथे आलेल्या पुरामुळे अनेकजण संकटात सापडले आहेत. संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांच्या सहकार्यासाठी यावर्षी दहीहंडी उत्सव न करता पीडितांना मदत करण्याचा निर्णय नवयुवक विद्यार्थी संघटनेने घेतला आहे, असे सांगितले. दहीहंडीसाठी जी वर्गणी गोळा होईल ती सर्व पूरग्रस्तांना मदत स्वरूपात पाठविली जाणार असून, अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सर्व दहीहंडी स्पर्धा आयोजकांनी सामाजिक भान राखून यावर्षी राज्यातील पूरपीडितांना मदत करण्याचे आवाहनही संजय देशमुख यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details