अमरावती -अमरावतीत मागील चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. अशातच म्यूकरमकोसिस या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात वाढत आहेत. म्यूकरमायकोसिसचे अमरावतीत सद्यस्थितीत एकूण 167 रुग्ण आहेत. यापैकी 51 जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
21 हजार जणांचे सर्व्हेक्षण
जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसचे रुग्ण शोधण्यासाठी कोरोना झालेल्या एकूण 21 हजार जणांचे आरोग्य सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. यापैकी 3 हजार जणांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून यापैकी 8 जणांना म्यूकरमायकोसिस झाल्याचे आढळुन आले आले.
51 रुग्णांवर उपचार
जिल्ह्यात आढळलेल्या 167 म्यूकरमायकोसिस रुग्णांपैकी 51 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, रिम्स हॉस्पिटल, रेडीएन्ट हॉस्पिटल, बेस्ट हॉस्पिटल, एक्झॉन हॉस्पिटल याठिकाणी उपचारासाठी रुग्ण दाखल आहेत.
इंजेक्शन साठा अपुरा
म्यूकरमायकोसिस रुग्णांना लागणाऱ्या इंजेक्शनचा साठा अपुरा आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन चार दिवसाआड अल्प प्रमाणात इंगशनचा साठा येत असून ज्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल आहे त्या रुग्णालयाशी संलग्नित औषधी केंद्राना हे इंजेक्शन पुरविले जात आहेत.
हेही वाचा -यंदाचा आषाढी पालखी सोहळा पंढरपूरला पायी जाणार; वारकरी आणि महाराज मंडळींची भूमिका