नवी दिल्ली -जूनचा महिना संपत आला आहे. महिना संपायला फक्त दोनच दिवस उरले आहेत. प्रत्येक नवीन महिन्याची सुरुवात अनेक बदल घेऊन येते. त्याच प्रमाणे येणारा जुलै महिनाही बदल घेऊन येत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्यावर खीशावर होईल. काह गोष्टींंत तुमचा खीसा कापला जाण्याची शक्यता आहे. १ जुलैपासून होत असलेल्या अशा बदलांवर एक नजर टाकूया.
1. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवर टीडीएस आकारला जाणार- सरकारने क्रिप्टोकरन्सीवर 30 टक्के कर लावला ( 30 percent tax on cryptocurrency )आहे. त्यामुळे आता 1 जुलैपासून क्रिप्टो गुंतवणूकदारांना आणखी एक झटका बसणार आहे. 1 जुलैपासून गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या क्रिप्टो व्यवहारांवर 1 टक्के दराने TDS भरावा लागणार आहे. मग क्रिप्टो मालमत्ता नफा किंवा नुकसान झाल्यावर विकला गेला असेल त्यावर तुम्हाला 1 टक्के दराने TDS भरावा लागणार आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर नजर ठेवण्यास सोप होईल हा यामागचा हेतू असल्याच सांगण्यात येत आहे.
2. भेटवस्तूंवर 10 टक्के दराने कर - 1 जुलैपासून भेटवस्तूंवर 10 टक्के दराने कर(10 percent Tax on gifts ) देखील भरावा लागणार आहे. यात भेटवस्तू म्हणून मिळालेले मोफत औषधांचे नमुने, परदेशी विमान तिकीट किंवा मिळालेल्या इतर महागड्या भेटवस्तूंवर हा यांचा समावेश असेल. अनेक वेळा एखाद्यी कंपनी मार्केटिंगच्या उद्देशाने भेटवस्तू देते. किंवा डॉक्टर विविध प्रकारची औषधे ( फेशिअल क्रीम, कॉस्मेटीक, सिरम ) देतात . आता त्यांना त्यावरही कर भरावा लागणार आहे.
3. कामगार संहितेची अंमलबजावणी -जुलैमहिना सुरू होताच कामगार संहितेचे नवीन नियम लागू ( Implementation of Labor Code) होण्याची शक्यता आहे. त्याच्या अंमलबजावणीमुळे, हातातील पगार, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा, पीएफ योगदान आणि ग्रॅच्युइटीवर परिणाम होणार आहे. अहवालानुसार, या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे कार्यलयातील कामाचे तास जास्तीत जास्त तास 12 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना ४ दिवसांत ४८ तास म्हणजेच दररोज १२ तास काम करावे लागणार आहे. तथापि, हा नियम एका विशिष्ट राज्याने घालून दिलेल्या नियमांच्या आधारे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदलू शकतो.