महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक ४२ अंशाने वधारून बंद; वाहनांसह ऑटोच्या शेअरमध्ये तेजी

एचडीएफसीचे शेअर सर्वाधिक २.०६ टक्क्यांनी वधारले. अॅक्सिस बँक, मारुती, रिलायन्स, पॉवर ग्रीड आणि टाटा स्टील कंपनीचे शेअरही वधारले.

Bombay stock exchange
मुंबई शेअर बाजार

By

Published : Dec 9, 2019, 5:07 PM IST

मुंबई -शेअर बाजार ४२ अंशाने वधारून ४०,४८७.४३ वर स्थिरावला. काही बँकांसह वाहन कंपन्यांचे शेअर वधारल्याने शेअर बाजार निर्देशांक वधारला.

शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात घसरला होता. शेअर बाजार बंद होताना ४२ अंशाने वधारून ४०,४८७.४३ वर स्थिरावला. निफ्टीच्या ५० कंपन्यांचा निर्देशांक १६ अंशाने वधारून ११,९३७.५० वर स्थिरावला.

हेही वाचा-'स्टेट बँके'चे गृहकर्जासह वाहनकर्ज स्वस्त; सलग आठव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
एचडीएफसीचे शेअर सर्वाधिक २.०६ टक्क्यांनी वधारले. अॅक्सिस बँक, मारुती, रिलायन्स, पॉवर ग्रीड आणि टाटा स्टील कंपनीचे शेअर हे वधारले. टीसीएस, एचसीएल, टेक, एल अँड टी, इंडुसइंड बँक, टेक महिंद्रा, एसबीआय आणि आयटीसीचे शेअर २.९३ टक्क्यापर्यंत घसरले.

हेही वाचा-गुंतवणुकीला चालना देण्याकरता कॉर्पोरेट करातील कपात - के. व्ही. सुब्रमण्यम

मुंबई शेअर बाजाराचा उर्जा निर्देशांक (बीएसई एनर्जी) १.०६ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ कच्चे तेल, गॅस आणि ऑटो कंपन्यांचे शेअर वधारले. आयटी आणि स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) निर्देशांकात घसरण झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details