मुंबई- शेअर बाजार निर्देशांक २९७ अंशाने घसरून बंद झाला. बँकिंग, ऑटो आणि धातुंचे शेअर घसरल्याने शेअर बाजारात पडझड झाली आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक २९७.५५ अंशाने घसरून ३७,८८०.४० अंशावर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ७८.७५ अंशाने घसरून ११,२३४.५५ वर स्थिरावला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
इंडसइंड बँकचे शेअर ६.१५ टक्क्यांनी घसरले. तर येस बँक, टाटा मोटर्स, वेदांत, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक, टाटा स्टीलचे शेअर ६.१५ टक्क्यांपर्यंत घसरले. तर भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचयूएल, एचसीएल टेक, पॉवरग्रीड, सनफार्मा, एशियन पेंट्स आणि बजाज ऑटोचे शेअर ५.०५ टक्क्यांनी वधारले.
मूडीजने जीडीपीच्या अंदाजात केली घट
मूडीज या गुंतवणूकदारांना सेवा देणाऱ्या कंपनीने देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपी) आणखी घट होणार असल्याचा अंदाज केला आहे. मूडीजने जीडीपी पूर्वीचा ६.२ टक्क्यांचा अंदाज बदलून ५.८ टक्के हा नवा अंदाज वर्तविला आहे. अर्थव्यवस्थेत मंदावलेल्या स्थितीचा स्पष्ट अनुभव येत असल्याचेही मूडीजने म्हटले आहे.