मुंबई- शेअर बाजाराने सलग तिसऱ्यांदा विक्रमी निर्देशांक नोंदविला आहे. आयटी, उर्जा, ऑटो या कंपन्यांच्या शेअरची खरेदी आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या निधीचा ओघ या कारणाने शेअर बाजारात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराने ४१,६७३.९२ या विक्रमी निर्देशांकाचा टप्पा गाठला.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक ११५.३५ अंशाने वधारून ४१,६७३.९२ अंशावर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ३८.०५ अंशाने वधारून १२,२५९.७० वर स्थिरावला.
शेअर बाजार निर्देशांक आलेख संबंधित बातमी वाचा- शेअर बाजार निर्देशांकात अंशत: घसरण; गुंतवणुकदारांची सावध भूमिका
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
येस बँकेचे सर्वाधिक ६.७४ टक्क्यांनी शेअर वधारले. टीसीएस, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एम अँड एम आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअरही वधारले. वेदांत, एचडीएफसी, सन फार्म आणि इंडुसइंड बँकेचे शेअर २.२६ टक्क्यांनी घसरले.
हेही वाचा-देशात रेशन कार्डाची संरचनाही एकच असणार; केंद्राचे राज्यांना निर्देश