महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सलग पाचव्या सत्रात शेअर बाजाराची पडझड सुरुच, निर्देशांक ३२४ अंशाने घसरला

आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलची तिमाहीदरम्यानची आकडेवारी गुंतवणुकदारांना आकर्षित करू शकली नाही. दोन्ही कंपन्यांच्या शेअरची विक्री होताना दिसून आली. शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३२४ अंशाने घसरून होऊन बाजार ३८,२७६ वर बंद झाला

मुंबई शेअर बाजार

By

Published : May 7, 2019, 7:27 PM IST

मुंबई - सलग पाचव्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३२४ अंशाने घसरण झाली आहे. चीन-अमेरिकेतील व्यापारी संबंध ताणले जात असताना आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाहीदरम्यान मंदावलेले निकाल याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे.

आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलची तिमाहीदरम्यानची आकडेवारी गुंतवणुकदारांना आकर्षित करू शकली नाही. दोन्ही कंपन्यांच्या शेअरची विक्री होताना दिसून आली. शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३२४ अंशाने घसरून होऊन बाजार ३८,२७६ वर बंद झाला. तर निफ्टीच्या निर्देशांकातही १०० अंशाची घसरण झाली. निफ्टी ११, ४९७.९० वर बंद झाला. गेली काही दिवस भारतीय बाजारपेठ (मार्केट) अस्थिर झाली आहे. कारण चीन आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या व्यापारी तडजोडीबाबत संदिग्धता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कार्पोरेट कंपन्यांच्या तिमाही आकडेवारीही उत्साहवर्धक नसल्याचे सेंट्रम ब्रोकिंगचे सिनिअर व्हीपी जगन्नाधाम धुनुगुंटला यांनी सांगितले.

शेअर बाजार आज सकाळच्या सत्रात सावरून निर्देशांकात १७० अंशाची वाढ झाली होती. तर निफ्टीचा निर्देशांक ३८.७० अंशाने वधारला होता. बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमुळे हा सकारात्मक परिणाम दिसून आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details