मुंबई- खनिज तेलाच्या ( ब्रेंट क्रूड) बॅरलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज महागले आहेत. हा दर प्रति बॅरल ६७ डॉलरवर पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात बॅरलची किंमत आज सर्वाधिक राहिली आहे.
पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेने (ओपेक) आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या पुरवठ्यात कपात केली आहे. त्याचा परिणाम म्हणून खनिज तेलाचे दर ०.३१ टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या प्रति बॅरलची किंमत ही ६७.४१ डॉलर झाली आहे. चालू महिन्याच्या प्रारंभी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व चीनमध्ये कराराच्या पहिल्या टप्प्यावर सही करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे दोन आर्थिक महासत्तामधील व्यापार युद्ध संपुष्टात येणार आहे.
हेही वाचा -....तर पेट्रोलसह डिझेलच्या किमती भडकणार