महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

इंधन दरवाढीचा उच्चांक: दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९०.१० रुपये

सरकारी विपणन कंपन्यांनी पेट्रोलचे दर प्रति लिटर ३१ पैसे तर डिझेलचे दर ३३ पैशांनी वाढविले आहेत. या दरवाढीनंतर पेट्रोलची किंमत दिल्लीत प्रति लिटर ९०.१९ रुपये तर डिझेलची किंमत ८०.६० रुपये आहे.

पेट्रोल किंमत न्यूज
पेट्रोल किंमत न्यूज

By

Published : Feb 19, 2021, 3:00 PM IST

नवी दिल्ली - सलग अकराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९०.१० रुपये आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे.

सरकारी विपणन कंपन्यांनी पेट्रोलचे दर प्रति लिटर ३१ पैसे तर डिझेलचे दर ३३ पैशांनी वाढविले आहेत. या दरवाढीनंतर पेट्रोलची किंमत दिल्लीत प्रति लिटर ९०.१९ रुपये तर डिझेलची किंमत ८०.६० रुपये आहे.

हेही वाचा-रेलटेलच्या भागविक्रीत शेवटच्या दिवशी २.६४ पटीने अधिक अर्जभरणा

  • देशातील बहुतांश महानगरांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ९० रुपयांहून अधिक आहेत.
  • महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांहून अधिक आहेत. या राज्यांमध्ये पेट्रोलियम उत्पादनांवर स्थानिक करांचे प्रमाणही अधिक आहे.
  • देशात ९ फेब्रुवारीपासून पेट्रोलचे दर प्रति लिटर ३.२४ रुपये तर डिझेलचे दर ३.४७ रुपयांनी वाढले आहेत.
  • देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर ३० ते ३५ पैशांनी वाढले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९६.६२ रुपये आहे. तर डिझेलचा दर ८७.६७ रुपये प्रति लिटर आहे.
  • जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर शुक्रवारी प्रति बॅरल ६५ डॉलर राहिले आहेत. नवीन वर्षात पेट्रोलचे दर २३ वेळा वाढले आहेत. या दरवाढीनंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर ६.४८ रुपये आणि डिझेलचे दर ६.७३ रुपये आहेत.

हेही वाचा-देशातील सर्व महामार्गांवर १०० टक्के रोकडविरहित टोल संकलन

ABOUT THE AUTHOR

...view details