महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाने गुंतवणूकदांराचे चार दिवसातच १९.४९ लाख कोटी रुपये पाण्यात

सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांनी १९,४९,४६१.८२ कोटी रुपयांचे भांडवली मूल्य गमाविले आहे. मुंबई शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ५८१.२८ अंशांनी घसरला.

कोरोना परिणाम
कोरोना परिणाम

By

Published : Mar 19, 2020, 8:06 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने शेअर बाजार गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या चार दिवस गुंतवणूकदारांनी सुमारे १९.४९ लाख कोटी रुपये गमावले आहेत. कोरोनाची भीती आणि त्याचा अर्थव्यस्थेवर परिणाम होणार असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत.

सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांनी १९,४९,४६१.८२ कोटी रुपयांचे भांडवली मूल्य गमाविले आहे. मुंबई शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ५८१.२८ अंशांनी घसरला. गेल्या चार दिवसात शेअर बाजाराच्या निर्देशांकात सुमारे ५,८१५.२५ अंशांनी घसरण झाली आहे. कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने बाजारात निराशा वाढल्याचे रिलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अजित मिश्रा (रिसर्च) यांनी सांगितले.

३० शेअरच्या सूचीपैकी २२ कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. बजाज फायनान्स, मारुती सुझुकी इंडिया, अॅक्सिस बँक, एम अँड एम, टेक महिंद्रा आणि ओएनजीसीच्या शेअरमध्ये १०.२४ टक्क्यांची घसरण झाली आहे.

हेही वाचा-कोरोनाची आर्थिक झळ : इंडिगोकडून वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

मुंबई शेअर बाजारामधील १,८२८ कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर ५७४ कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. तर १४६ कंपन्यांचे शेअर स्थिर राहिले आहेत. शेअर बाजारामधील सुमारे १,२०० हून अधिक कंपन्यांचे शेअर वर्षभरातील निचांकी दरावर पोहोचले आहेत. बीएसई मेटल आणि कॅपिटल गुड्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक ७.१७ टक्क्यांची घसरण झाली आहे.

हेही वाचा-विलगीकरणात राहावे लागले तर ही कंपनी कर्मचाऱ्यांना देणार पूर्ण वेतन

ABOUT THE AUTHOR

...view details