महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

दुसऱ्या तिमाहीत नोटबुकच्या विक्रीत वाढ; पीसी विक्रीत एचपीची आघाडी

एचपी ही पीसीच्या श्रेणीतही विक्री करण्यात आघाडीवर राहिली आहे. आघाडीच्या पाच कंपन्यांपैकी केवळ एचपीने चालू आर्थिक वर्षाच्या जूनच्या तिमाहीत वृद्धीदर अनुभवला आहे.

By

Published : Aug 11, 2020, 7:13 PM IST

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली– बहुतांश कर्मचारी घरातून काम करत असल्याने विविध उद्योगांकडून नोटबुकच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम म्हणून जूनच्या तिमाहीत नोटबुकच्या (लहान आकाराचा लॅपटॉप) विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे.

गतवर्षीच्या जूनच्या तिमाहीच्या तुलनेत देशामध्ये असलेले पंरपरागत पीसीची बाजारपेठ, नोटबुक आणि वर्कस्टेशनच्या विक्रीत 37.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. ही माहिती बाजारपेठ संशोधन संस्था आयडीसीने अहवालात दिली आहे. असे असले तरी नोटबुकच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.

नोटबुकच्या बाजारपेठेत एचपी कंपनीचा सर्वाधिक हिस्सा

नोटबुकच्या बाजारपेठेत एचपी कंपनीचा सर्वाधिक 32.8 टक्के हिस्सा राहिला आहे. नोटबुकच्या बाजारपेठेत लेनोवोचा 27.5 टक्के हिस्सा राहिला आहे. तर डेलचा नोटबुकच्या बाजारपेठेत 17.8 टक्के हिस्सा राहिला आहे. असे असले तरी डेलच्या एकूण उलाढालीत 62.7 टक्क्यांची घसरण झाली आहे. काही मोठ्या ऑर्डर मिळाल्याने एचपीने वाणिज्य श्रेणीत दमदार कामगिरी केली आहे. एचपी ही पीसीच्या श्रेणीतही विक्री करण्यात आघाडीवर राहिली आहे. आघाडीच्या पाच कंपन्यांपैकी केवळ एचपीने चालू आर्थिक वर्षाच्या जूनच्या तिमाहीत वृद्धीदर अनुभवला आहे.

पहिल्या तिमाहीत होती आव्हाने-

आयडीसी इंडियाचे बाजारपेठ विश्लेषक (पीसी विभाग) भारत शेणॉय म्हणाले, की पुरवठा आणि लॉजिस्टिकची पहिल्या तिमाहीत सर्वाधिक आव्हाने होती. तरी कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात ऑर्डर पुरविल्या आहेत. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोटबुकवरून काम करण्याच्या पहिल्यांदाच सूचना दिल्या आहेत.

पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत सुधारणा-

गतवर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत डेस्कटॉप पीसीच्या विक्रीत 46.4 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर एकूण सर्व ग्राहकांच्या श्रेणीत गतवर्षीच्या तुलनेत 21 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र पहिल्या तिमाहीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. ऑनलाईन खरेदीने उत्पादनांची विक्री वाढविण्यात दुसऱ्या तिमाहीत महत्त्वाची भूमिका अनुभवली आहे. पुरवठादारांनी त्यांच्या एकूण पीसी विक्रीपैकी एक तृतीयांश पीसी ऑनलाईन विकल्याचे आयडीसीच्या अहवालात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details