महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोने महागले! प्रति तोळा ८५७ रुपयाने वाढून 'एवढी' झाली किंमत

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये फेब्रुवारीकरिता सोने हे प्रति तोळा (१० ग्रॅम) ८५७ रुपयांनी महागले आहे.  न्यूयॉर्कमध्ये सोने प्रति औंस १,५७८.४० डॉलरने वधारले आहे.

Gold rates hike
सोने भाववाढ

By

Published : Jan 6, 2020, 1:54 PM IST

नवी दिल्ली- सोन्याची हौस असणाऱ्यांची चिंता वाढविणारी बातमी आहे. मध्यपूर्वेत तणाव वाढत असताना सोन्याचे भाव वाढले आहेत. सोने प्रति तोळा ८५७ रुपयांनी वाढून ४०,९६९ रुपये झाले आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये फेब्रुवारीकरिता सोने हे प्रति तोळा (१० ग्रॅम) ८५७ रुपयांनी महागले आहे. न्यूयॉर्कमध्ये सोने प्रति औंस १,५७८.४० डॉलरने वधारले आहे.

अमेरिका-इराणच्या तणावाने आर्थिक अस्थिरता-

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा कमांडर कासीम सुलेमानी यांना ठार मारण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर गल्फ देशांमध्ये तणाव वाढला आहे.

हेही वाचा-शेअर बाजारात ५३० अंशाची पडझड; कच्च्या तेलाचे दर भडकले

  • इराण जगाला खनिज तेल पुवठा करणारा आघाडीचा देश आहे. इराणकडून खनिज तेलाचा पुरवठा कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.
  • इराण-अमेरिकेत तणाव वाढत असताना रुपयाची डॉलरच्या ४२ पैशांची शुक्रवारी घसरण झाली आहे.
  • मुंबई शेअर बाजार निर्देशांकात ५३० अंशाची पडझड झाली आहे.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा 'भडका'; मुंबईत पेट्रोल ८१.२८ रुपये/लिटर

ABOUT THE AUTHOR

...view details