नवी दिल्ली- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंड्यांची मागणी पुन्हा वाढ झाली आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बर्ड फ्ल्यूच्या भीतीने अंड्यांची मागणी घसरण झाली होती. प्रतिकारक्षमता वाढावी, या हेतूने नागरिकांमधून अंड्यांची मागणी वाढली आहे.
बर्ड फ्ल्यूच्या भीतीने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अंड्यांच्या मागणीत घसरण झाली होती. त्याचा कुक्कुट पालन उद्योगाला फटका बसला होता. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर अंड्यांच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. किरकोळ विक्रीत अंडी प्रति नग हे 6 ते 7 रुपयापर्यंत पोहोचले आहेत.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ११६ घसरण; चांदीही स्वस्त
अंड्यांमध्ये प्रथिनांचे 11 टक्के एवढे सर्वाधिक प्रमाण
पशुसंवर्धन आणि कुक्कुट आणि दुग्ध मंत्रालयाचे संयुक्त सचिव ओ. पी. चौधरी म्हणाले, की गेल्या काही महिन्यांत अंडी खरेदीचे ग्राहकांमध्ये प्रमाण वाढले आहे. प्रथिनांचे 11 टक्के एवढे सर्वाधिक प्रमाण हे अंड्यामध्ये असते. दुसऱ्या अधिकाऱ्याने दर महिन्यात अंड्यांच्या मागणीत झालेल्या वाढीबाबतची आकडेवारी सांगणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.