महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोना संसर्ग महागात ; दलाल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी पाण्यात

मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या भांडवली मूल्याला फटका बसला आहे. शेअर बाजार गुंतवणूकदारांचे ४ लाख ६५ हजार ९१५.५८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कंपन्यांनी १ कोटी ४७ लक्ष ७४ हजार १०८.५० कोटी रुपयांचे भांडवली मूल्य कंपन्यांनी गमाविले आहे.

By

Published : Feb 28, 2020, 2:02 PM IST

Updated : Feb 28, 2020, 2:28 PM IST

नवी दिल्ली- जगभरात आरोग्याची चिंता वाढविणाऱ्या कोरोनाचा शेअर बाजार गुंतवणूकदाराला आज मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेअर बाजार निर्देशांकात एक हजार एकशे अंशांनी घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे सुमारे पाच लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या भांडवली मूल्याला फटका बसला आहे. शेअर बाजार गुंतवणूकदारांचे ४ लाख ६५ हजार ९१५.५८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कंपन्यांनी १ कोटी ४७ लाख ७४ हजार १०८.५० कोटी रुपयांचे भांडवली मूल्य कंपन्यांनी गमाविले आहे.

हेही वाचा-'दिल्लीतील हिंसेचा गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम नाही'

मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध असलेल्या १ हजार ६०२ कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. तर १८३ कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. ६२ कंपन्यांचे शेअर स्थिर राहिले आहेत. मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात निर्देशांक १ हजार १००.२७ अंशांनी घसरून ३८ हजार ६४५.३९ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ३२९.५० अंशांनी घसरून ११ हजार ३०३.८० वर पोहोचला.

संबंधित बातमी वाचा-शेअर बाजारात १,१०० हजार अंशांनी आपटी; जाणून घ्या पडझडीमागील कारणे

शेअर बाजाराची सर्वच क्षेत्रात घसरण झाली आहे. टाटा स्टील, टेक महिंद्रा, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, एचसीएल टेक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून निधी काढून घेण्याचे प्रमाण वाढविले आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून ३ हजार १२७.३६ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे.

Last Updated : Feb 28, 2020, 2:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details