नवी दिल्ली - घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण फेब्रुवारीमध्ये वाढून ४.१७ टक्के आहे. अन्न, कच्चे तेल आणि वीजेचे दर वाढल्याने ही महागाई वाढली आहे.
जानेवारीत घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण २.०३ टक्के होते. तर गतवर्षी फेब्रुवारीमध्ये घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण २.२६ टक्के होते.
हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत फेब्रुवारीमध्ये महागाई वाढून ५.०३ टक्क्यांची नोंद
- अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण घसरून फेब्रुवारीमध्ये १.३६ टक्के झाले आहे.
- जानेवारीत अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण घसरून जानेवारीमध्ये घसरूण (-) २.९० टक्के झाले आहे.
- पालेभाज्यांमधील महागाईचे प्रमाण फेब्रुवारीमध्ये (-) २.९० टक्के आहे. तर पालेभाज्यांमधील महागाईचे प्रमाण जानेवारीमध्ये (-) २०.८२ टक्के आहे.
- डाळीमधील महागाईचे प्रमाण फेब्रुवारीमध्ये १०.२५ टक्के राहिले आहे. तर फळांमधील महागाई ही ९.४८ टक्के, इंधन आणि वीजेच्या महागाईचे प्रमाण ०.५८ टक्के आहे.
- ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित फेब्रुवारीमध्ये महागाईचे प्रमाण हे ५.०३ टक्के राहिले आहे.