नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सभागृहातील विरोधी सदस्यांनी गदारोळ सुरू केला. गदारोळ असतानाही सीतारमण यांनी भाषण वाचण्यास सुरवात केली. यावेळी त्यांनी शेरो-शायरीची परंपरा कायम ठेवत रवींद्रनाथ टागोरांची कविता वाचली.
'मी रवींद्रनाथ टागोर यांच्या एका ओळीचा उल्लेख करते, असे त्या म्हणाल्या. 'Faith is the bird that feels the light and sings when the dawn is still dark." अर्थात "विश्वास एक असा पक्षी आहे, जो पहाटेच्या अंधकारातही प्रकाश अनुभवतो आणि गातो, असे या कवितेचे बोल आहेत. (विश्वास वह पक्षी है जो प्रकाश को महसूस करता है और जब भोर अंधेरा होता है तो गाता है) रविंद्रनाथ टागोर हे मुळचे बंगालचे होते आणि आगामी काळात बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.
कोरोना संकटकाळात केंद्र सरकारने गरिबांना मदत केली. कोरोना संकटाच्या वेळी लघु व मध्यम उद्योगांच्या सरकारने 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत एकूण 27.1 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये अभूतपूर्व मंदी आली असूनही भारताने चांगली कामगिरी केली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या.