नवी दिल्ली- जीवनातही आणि जीवनानंतरही अशी ओळख असलेले भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) देशाच्या विकासातही योगदान देत आहे. देशातील महामार्ग विकास प्रकल्पांसाठी एलआयसी २०२४ पर्यंत १ लाख २५ हजार कोटींचे कर्ज देणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
केंद्र सरकारचा ८.४१ कोटींचा 'भारतमाला' हा महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पेन्शन आणि विमा फंड अशा विविध स्त्रोतातून निधी जमविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबाबत माहिती देताना गडकरी म्हणाले, एलआयसीने एका वर्षात २५ हजार कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर पाच वर्षात १.२५ लाख कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा निधी महामार्गाच्या कामाकरिता वापरण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात नितीन गडकरींनी एलआयसीचे चेअरमन आर.कुमार यांच्याबरोबर बैठक घेतली आहे.
काय आहे भारतमाला प्रकल्प-
भारतमाला प्रकल्पाला सुरुवातीच्या टप्प्यात ५.३५ लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, भूसंपादनासाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्यात वाढ झाल्याने भारतमाला प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. या प्रकल्पात ३४ हजार ८०० किमीच्या महामार्गांचे काम करण्यात येणार आहे. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाचे (एनएचडीपी) १० हजार किमीच्या रस्त्याचा समावेश आहे.
असा जमिवण्यात येणार निधी-