चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७.२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल - आशियन डेव्हलपमेंट बँक
२०१९ मध्ये पुन्हा आर्थिक विकासदराचा हा गाडा पूर्वीच्याच म्हणजे ७.२ टक्क्याच्या रुळावर येईल असे एडीओने म्हटले आहे.
नवी दिल्ली - निवडणुकीच्या तोंडावर आशियन डेव्हलपमेंट बँकेने विकासदराबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७.२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीओ) वर्तवला आहे.
देशाचा आर्थिक विकासदर २०१७ मध्ये ७.२ टक्क्यांवर होता. तो २०१८ मध्ये ७ टक्के झाल्याचे एडीओने म्हटले आहे. कमी झालेले कृषी उत्पन्न आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि सरकारी खर्चाचे कमी झालेले प्रमाण यामुळे हा विकासदर कमी झाला होता. २०१९ मध्ये पुन्हा आर्थिक विकासदराचा हा गाडा पूर्वीच्याच म्हणजे ७.२ टक्क्याच्या रुळावर येईल असे एडीओने म्हटले आहे. तर आर्थिक वर्ष २०२० मध्ये विकासदर हा ७.३ टक्के होईल, असा अंदाज एडीओने व्यक्त केला आहे.