वॉशिंग्टन– फिच, मूडीजनंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफम) देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर मोठ्या प्रमाणात घसरणार असल्याचा अंदाज केला आहे. चालू वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर हा 4.5 टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज आयएमएफमने म्हटले आहे. ही ऐतिहासिक घसरण असेल, असे आयएमएफने म्हटले आहे.
अभूतपूर्वक अशा कोरोना महामारीमुळे आर्थिक चलनवलन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प पडल्या होत्या. मात्र, भारत हा पुन्हा अर्थव्यस्थेच्या पूर्ववत स्थितीला 2021 मध्ये येईल, अशी आयएमएफने अपेक्षा व्यक्त केली आहे. देशाचा 2021 मध्ये विकासदर हा सहा टक्के राहिल, असा आयएमएफमने अंदाज व्यक्त केला आहे. आयएमएफने 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 4.9 टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर हा विकासदर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूक फॉरकास्टने एप्रिलमध्ये वर्तविलेल्या अंदाजाहून 1.9 टक्के कमी आहे.