महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाचा देशाच्या तिजोरीला संसर्ग; कर संकलनात 'इतकी' झाली घसरण

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल प्रत्यक्ष कराचे संकलन 31 टक्क्यांनी घसरून 1 लाख 37 हजार 825 कोटी रुपये झाले आहे. तर मागील वर्षी जूनमध्ये 1 लाख 99 हजार 755 कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते.

Tax collection
प्रतिकात्मक - कर संकलन

By

Published : Jun 16, 2020, 8:17 PM IST

मुंबई – कोरोना महामारीचा देशाच्या महसुलावर मोठा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. देशाच्या सकल कर संकलनात पहिल्या तिमाहीत 15 जूनपर्यंत 31 टक्के घसरण झाली आहे. तर आगाऊ (अॅडव्हान्स) कॉर्पोरेट करात 79 टक्के घसरण झाली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल प्रत्यक्ष कराचे संकलन 31 टक्क्यांनी घसरून 1 लाख 37 हजार 825 कोटी रुपये झाले आहे. तर मागील वर्षी जूनमध्ये 1 लाख 99 हजार 755 कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते, अशी माहिती प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोरोनाच्या संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जूनच्या तिमाहीत देशभरातील80 टक्के आर्थिक चलनवलन ठप्प होते. त्याचा फटका कर संकलनाला बसला आहे. देशात टाळेबंदी 1 ही 1 जूनपासून खुली करण्यात आली आहे. असे असले तरी अर्थव्यवस्था अद्याप पूर्वीप्रमाण रुळावर आलेली नाही. दरम्यान, आगाऊ कर भरण्याची 15 जून अंतिम मुदत होती.

ABOUT THE AUTHOR

...view details