महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षापासून पूर्वपदावर येईल'

घसरणीतून बाहेर येताना अर्थव्यवस्थेने लवचिकता दाखविली आहे. काही काळ कॉर्पोरेटकडून गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ होईल, असा विश्वास स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश कुमार खारा यांनी व्यक्त केला.

ट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश कुमार खारा
ट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश कुमार खारा

By

Published : Nov 7, 2020, 4:22 PM IST

कोलकाता- कोरोना महामारीतही देशाची अर्थव्यवस्था लवचिक असल्याचे दिसून आले आहे. देशाची अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात पूर्वपदावर येईल, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश कुमार खारा यांनी म्हटले आहे. ते बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत बोलत होते.

अर्थव्यवस्था अधिक प्रगल्भ होईल, असा विश्वास स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश कुमार खारा यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, की एप्रिल २०२१ पासून नवीन वर्ष सुरू होताना अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर नवीन अशा पद्धतीने अर्थव्यवस्था सामान्य होणार आहे. त्यामधील काही बदल कायमस्वरुपी असणार आहेत. घसरणीतून बाहेर येताना अर्थव्यवस्थेने लवचिकता दाखविली आहे. काही काळ कॉर्पोरेटकडून गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

काय म्हणाले स्टेट बँकेचे चेअरमन?

  • कॉर्पोरेशन्सकडून ६९ टक्के प्रमाणात त्यांच्या क्षमतांचा वापर होत आहे.
  • चांगले भांडवल असलेल्या सार्वजनिक बँकांकडून भांडवली खर्चाचे नियोजन करण्यात येईल.
  • कॉर्पोरेट क्षेत्राकडून कर्ज घेताना काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी म्हटले.
  • सिमेंट आणि स्टील ही अर्थव्यवस्थेमधील पायाभूत क्षेत्र एप्रिल २०२० पासून चांगली कामगिरी करत आहेत. ते निर्यात करू शकण्याच्या स्थितीत आहेत.
  • असे असले तरी कोरोना महामारीत प्रवास, पर्यटन आणि आदरातिथ्य या क्षेत्रांना सर्वात मोठा फटका बसला आहे.

असा आहे जागतिक नाणेनिधीचा अंदाज

कोरोनाच्या संकटात भारतीय अर्थव्यवस्थेत या वर्षात १०.३ टक्क्यांची घसरण होणार असल्याची माहिती जागतिक नाणेनिधीने (आयएमएफ) नुकतेच दिली. याच काळात जागतिक अर्थव्यवस्था ४.४ टक्क्यांनी घटणार असल्याचेदेखील यामध्ये नमूद करण्यात आले. तसेच आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ५.२टक्क्यांनी अर्थव्यवस्था वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details