नवी दिल्ली -जे करदाते जीसीएटीआरचे विवरणपत्र अद्याप भरू शकले नाहीत, त्यांच्यासाठी खूशखबर आहे. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी जीएसटीआर-9 (वार्षिक विवरणपत्र) आणि जीएसटीआर 9 सी (रिकन्सीलिएशन स्टेटमेंट) हे फॉर्म दाखल करण्याची मुदत 31 डिसेंबर 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर 2018-19 या वर्षासाठी ही मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
विवरणपत्रामधील विविध भाग ऐच्छिक करून ते अधिक सुलभ करण्याचा केंद्र सरकारने निर्णयही घेतला आहे. विवरण पत्रातील बदलामुळे आणि वाढीव मुदतीमुळे प्राप्तिकरदाते 2017-18 आणि 2018-19 या आर्थिक वर्षासाठी त्यांचे वार्षिक विवरणपत्र वेळेत भरू शकतील, अशी केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाला अपेक्षा आहे.