संयुक्त राष्ट्रसंघ - कोरोनाने जगभरातील २.५ कोटी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याची शक्यता आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेने (आयएलओ) व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय धोरणात समन्वय झाला तर हे बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल, असे या संस्थेने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था आहे. या संस्थेने 'कोविड -१९ आणि जगाचे काम : परिणाम आणि प्रतिसाद' असा अहवाल तयार केला आहे. या अहवालात कामगारांचे कामाच्या ठिकाणी संरक्षण, अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना देणे या तीन मुख्य मुद्द्यावर भर दिला आहे. त्यासाठी तातडीने आणि मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय धोरण समन्वयाने राबवावे, असे आयएलओने म्हटले आहे. यामध्ये सामाजिक सुरक्षा, वित्तीय आणि कर दिलासा आदींचा समावेश आहे.