नवी दिल्ली - टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारचे जगभरात अनेक चाहते आहेत. टेस्लाच्या भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी इलेक्ट्रिक कार पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.
एलॉन यांना ट्विटरवरून वापरकर्त्याने भारतामध्ये कधी कार येणार, हा प्रश्न विचारला होता. त्यावर मस्क यांनी भारतामध्ये येण्याचे नियोजन असल्याचे सांगितले आहे.
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे ट्विटरवर खूप सक्रिय असतात. इडिया वाँटस टेस्ला आणि इंडिया लव्हज टेस्ला असे लिहिलेल्या टी शर्टचे ट्विट एका वापरकर्त्याने करत मस्क यांना भारतामधील नियोजनाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर मस्क यांनी नक्कीच पुढील वर्षी असे उत्तर दिले आहे. प्रतीक्षा पाहत आहेत, त्याबाबत धन्यवाद, असेही टेस्लाचे सीईओ यांनी त्या वापरकर्त्याला म्हटले आहे.