महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टाटाचा डिजीटल इकोसिस्टिममध्ये विस्तार; 1एमजीमध्ये मोठा हिस्सा खरेदी

टाटा डिजीटलने नुकतेच क्यूरफिट हेल्थकेअरमध्ये सुमारे ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काहीच दिवसांत टाटा डिजीटलने १ एमजी हेल्थकेअरमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे.

By

Published : Jun 10, 2021, 3:39 PM IST

डिजीटल इकोसिस्टिम
डिजीटल इकोसिस्टिम

नवी दिल्ली - टाटा सन्सची मालकी असलेल्या टाटा डिजीटल लि. कंपनीने डिजीटल इकोसिस्टिम भक्कम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. टाटा डिजीटलने १ एमजी टेक्नॉलॉजीस ही ऑनलाईन हेल्थकेअर मार्केटप्लेस कंपनीत मोठा हिस्सा खरेदी केला आहे. मात्र, नेमका किती हिस्सा खरेदी केला, याची माहिती टाटा डिजीटलने दिली नाही.

टाटा डिजीटलने नुकतेच क्यूरफिट हेल्थकेअरमध्ये सुमारे ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काहीच दिवसांत टाटा डिजीटलने १ एमजी हेल्थकेअरमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. टाटा ग्रुपने कालानुरूप ग्राहकांची गरज लक्षात घेऊन डिजीटल इकोसिस्टिम तयार करण्याचे व्हिजन ठेवले आहे. त्यानुसार टाटा ग्रुपने विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. ई-फार्मसी, ई-डायग्नोस्टिक्स आणि टेली-कन्स्लटेशन हे इकोसिस्टिमध्ये महत्त्वाचे आणि महामारीत सर्वाधिक वेगाने वाढणारे घटक आहेत.

हेही वाचा-नोटा छापणे हा आरबीआयपुढे शेवटचा पर्याय असायला पाहिजे- डी. सुब्बाराव

ग्राहकांना उत्कृष्ट देण्याची कंपनीची क्षमता वाढणा

आरोग्यक्षेत्राची बाजारपेठ हे सुमारे १ अब्ज डॉलरची आहे. आरोग्याबाबत जनजागृतीमुळे यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. टाटा डिजीटलचे सीईओ प्रतीक पाल म्हणाले, की १ एमजीमध्ये टाटाने गुंतवणूक केल्याने ग्राहकांना उत्कृष्ट देण्याची कंपनीची क्षमता वाढणार आहे. आरोग्य उत्पादने आणि सेवेकरिता ई-फार्मसी आणि ई-डायग्नोस्टिकमध्ये उच्च तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

हेही वाचा-मुंबई शेअर बाजारात दिवसाखेर ३३४ अंशांची घसरण

टाटाची गुंतवणूक ही १एमजीच्या प्रवासामध्ये मैलाचा दगड

१एमजीचे सहसंस्थापक आणि सीईओ प्रशांत टंडन म्हणाले, की टाटाची गुंतवणूक ही १एमजीच्या प्रवासामध्ये मैलाच्या दगडाप्रमाणे महत्त्वाची आहे. १ एमजीमधून भारतामधील ग्राहकांना उच्च दराची आरोग्य उत्पादने आणि सेवा देण्याचा प्रयत्न आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details