नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान निधीसाठी १०० कोटींची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
देशात सर्वाधिक कर्ज देणाऱ्या स्टेट बँकेत २ लाख ५६ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे वेतन पीएम केअर्स फंडला देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रयत्नांमधून स्टेट बँकेचे कर्मचारी १०० कोटींची मदत करण्यासाठी वचनबद्ध आहेत.