नवी दिल्ली- एकेकाळी मोबाईलमध्ये आघाडीवर असलेल्या नोकिया कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ राजीव सुरी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे नोकिया सिमेन्स नेटवर्कचीही जबाबदारी होती. त्यांच्या जागी पेक्का लुंडमार्क हे जबाबदारी घेणार आहेत.
राजीव सुरी म्हणाले, नोकियामधील २५ वर्षानंतर मला काहीतरी वेगळे करायचे आहे. नोकिया हा नेहमीच माझा भाग होता. मी प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. नोकिया हे आणखी चांगले ठिकाण करण्यासाठी मी अनेक वर्ष प्रयत्न केली आहेत. त्यामधून मी एक चांगला नेता (लीडर) झालो आहे. नोकियाच्या सीईओपदी नियुक्ती होणारे लुंडमार्क हे सध्या फिनलँडमधील आघाडीची उर्जा कंपनी फोर्टमचे अध्यक्ष व सीईओ आहेत. ते १ सप्टेंबरला नोकियाच्या सीईओपदाची जबाबदारी घेण्याची शक्यता आहे.