नवी दिल्ली - क्वालकॉम इंडिया या चीप तयार करणाऱ्या कंपनीने कोरोनाच्या लढ्यात भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी भारताला १.५ दशलक्ष डॉलर (सुमारे ११.३ कोटी रुपये) देणार आहे.
क्वालकॉमने आर्थिक मदत ही पीएम केअर्स फंडमधून आणि विविध सार्वजनिक मदतनिधीमधून देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी ही मदत करण्यात येणार असल्याचे क्वालकॉमने म्हटले आहे. कोरोना चाचणीचे किट्स, स्क्रीनिंग, पोलिसांसह डॉक्टरांना पीपीई आणि सॅनिटायझर देणे आणि गरजूंना अन्न पुरविणे यासाठीही मदत करण्यात येणार आहे.