मुंबई - प्रॉक्टर अँड गॅम्बल (पी अँड जी) कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझरचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही उत्पादने सरकारसह मदतकार्य करणाऱ्या संस्थाना देण्यात येणार आहे.
कंपनीने 'पी अँड जी सुरक्षा इंडिया' या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यामध्ये प्रथम रुरकीमध्ये सॅनिटायझरचे उत्पादन घेण्यात आले आहे. लवकरच तीनस्तरीय मास्कचे हैदराबादमध्ये उत्पादन घेण्यात येणार आहे.
हेही वाचा-कोरोनाने खनिज तेलाच्या किमतीला थंडावा; अठरा वर्षात बॅरलची किमत सर्वात स्वस्त!
सरकारसह मदतकार्य करणाऱ्या संस्थांना १० लाख ५० हजार मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याचे पी अँड जीचे सीईओ मधुसूदन गोपालन यांनी सांगितले. कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध महत्त्वाची उत्पादने देवून मदत करण्यात येणार आहे.
हेही वाचा- 'या' कंपनीकडून तामिळनाडू सरकारला १० हजार 'पीपीई'ची मदत