महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 21, 2020, 5:13 PM IST

ETV Bharat / business

फोर्स मोटर्सचे आकुर्डी, चाकणसह चेन्नईतील उत्पादन प्रकल्प सुरू होणार

सध्या, उत्पादन प्रकल्पांमध्ये ३३ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. नियम शिथील केल्यानंतर वेळोवेळी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली - चौथ्या टाळेबंदीत नियम शिथिल केल्यानंतर फोर्स मोटर्सने उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आकुर्डी, चाकण आणि चेन्नईमधील उत्पादन प्रकल्पाचा समावेश आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे फोर्स मोटर्सने २१ मार्चला उत्पादन प्रकल्प बंद केल्याची घोषणा केली होती. सध्या, उत्पादन प्रकल्पांमध्ये ३३ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. नियम शिथील केल्यानंतर वेळोवेळी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. यंत्रणेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मनुष्यबळाची सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा- मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ११४ अंशांनी वधारला; 'या' कंपन्यांचे शेअर तेजीत

नुकतेच टाटा मोटर्सने पुणे जिल्यातील रांजणगावचा उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details