नवी दिल्ली- अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओ ही जगातील सर्वात पाचवा मजबूत ब्रँड ठरली आहे. जिओपूर्वी फेरारी आणि कोका-कोला या कंपन्यांचा ब्रँडमध्ये वरचा क्रमांक आहे.
ब्रँड फायनान्स ही जगभरातील कंपन्यांच्या ब्रँडचे मूल्यांकन सर्वात आघाडीची कन्सल्टन्सी संस्था आहे. या संस्थेने 'ब्रँड फायनान्स ग्लोबल ५००' या जगातील सर्वाधिक मजबूत ब्रँडची यादी जाहीर केली आहे. यामध्ये वूईचॅट सर्वात आघाडीवर असल्याचे वार्षिक अहवालातून समोर आले आहे.
हेही वाचा-'दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा विचार करत अर्थसंकल्प सादर व्हावा'
काय म्हटले आहे मानांकन यादीत?
- जरी २०१६ मध्ये जिओची स्थापना झाली असली तरी कंपनी ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ठरली आहे.
- जगात तिसऱ्या क्रमांकाची मोबाईल नेटवर्क ऑपरेटर कंपनी आहे. या कंपनीचे ४० कोटी ग्राहक आहेत. जिओने बाजारपेठेत प्रवेश करता मोफत व्हाईस कॉलिंग आणि स्वस्तामध्ये डाटा प्लॅन जाहीर केले होते.
- विश्वसनीय परवडणारे दर, आकर्षित करणारे ४जीचे प्लॅन यामुळे भारतामधील इंटरनेट बाजारपेठे जिओमुळे बदलल्याचे ब्रँड फायनान्सने म्हटले आहे.
- कंपनीने ३० देशांमध्ये विविध २० क्षेत्रांवर ५० हजार जणांच्या प्रतिक्रिया घेऊन ही यादी जाहीर केली आहे.