नवी दिल्ली - समाज माध्यमातील आघाडीची कंपनी फेसबुकने जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचे भारतीय उद्योगजगतामधून स्वागत आहे.
कोरोनाच्या संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्व वाढणार असल्याचे संकेत फेसबुकच्या गुंतवणुकीतून मिळाल्याचे महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. फेसबुक जिओमध्ये ९.९९ टक्के हिस्सा घेणार आहे. ही तंत्रज्ञान कंपनीमधील जगात सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे. तर एफडीआयमधून (थेट विदेशी गुंतवणूक) ही देशातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे.