नवी दिल्ली- बीएसएनएलने सॅटेलाईटवर चालणारी इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) डिव्हाईस सर्व्हिस लाँच केली आहे. ज्या ठिकाणी मोबाईल टॉवर नसेल, त्या ठिकाणीही संपर्कयंत्रणा या नव्या सेवेमुळे वापरता येणार आहे. यामध्ये देशाच्या न्यायिक क्षेत्रात असलेल्या सागरी भागाचाही समावेश आहे.
जगात पहिल्यांदाच सॅटेलाईटचा वापर करून नॅरोबँडचे आयओटी नेटवर्कची सेवा देण्यात येणार आहे. ही सेवा बीएसएनएलने अमेरिकेची स्कायलो कंपनीबरोबर भागीदारी करून सुरू केली आहे. त्यासाठी लागणारे उपकरणे स्कायलोने भारतासाठी विकसित केली आहेत. स्कायलोने तयार केलेले उपकरण केवळ सरकारी यंत्रणेला वापरता येणार आहे. या उपकरणाची १० हजार रुपये किंमत आहे. हे चौरसाकृती उपकरण देशात कुठेही घेऊन जाता येते. ते स्मार्टफोनला जोडता येते.