महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अॅपलच्या पुरवठा साखळीचा फायदा; भारतात २० हजार जणांना नोकऱ्या

अहवालानुसार अॅपलच्या पुरवठादा, उत्पादक कंपन्यांनी पीएलआयच्या अर्जानुसार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मार्च २०२० पर्यंत अॅपलच्या पुरवठादार कंपन्यांकडून २३ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

By

Published : Jun 11, 2021, 5:02 PM IST

Apple
अॅपल

नवी दिल्ली - अॅपलने भारतामध्ये पुरवठा साखळी भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामधून देशात सुमारे २० हजार नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. डिजीटाईम्स एशियाच्या अहवालानुसार अॅपलचे पुरवठादार फॉक्सॉन्न, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या कंपन्यांनी उत्पादनावर आधारित सवलती योजनेसाठी (पीएलआय) अर्ज केला होता. तेव्हा नवीन रोजगार निर्मितीसाठी वचनबद्ध राहणार असल्याचे म्हटले होते.

अहवालानुसार अॅपलच्या पुरवठादा, उत्पादक कंपन्यांनी पीएलआयच्या अर्जानुसार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मार्च २०२० पर्यंत अॅपलच्या पुरवठादार कंपन्यांकडून २३ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. डिसेंबर २०२० मध्ये विस्ट्रॉन कंपनीत कामगारांनी हिंसक आंदोलन केले होते. तेव्हा कंपनीत १० हजार कामगार कार्यरत होते.

हेही वाचा-टाळेबंदीचा फटका : प्रवासी वाहनांच्या विक्रीत 66 टक्के घसरण

पेगाट्रॉन कंपनीही देशात करणार उत्पादन

पेगाट्रॉन कंपनीने मार्च २०२० अखेर ६ हजार ते ७ हजार कर्मचारी भरती करण्याचे नियोजन केले आहे. पेगाट्रॉनने अद्याप देशात उत्पादन सुरू केलेले नाही. २०१८ मध्ये अॅपलच्या पुरवठादार कंपन्यांची ६ संख्या होती. ही संख्या वाढून २०२० मध्ये ९ झाली आहे.

हेही वाचा-कॅनरा बँकेतील विलिनीकरणानंतर सिंडिकेट बँकेच्या शाखांचे बदलणार आयएफसी कोड

आयफोन १२ हा स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच

अॅपल पुरवठादारांची संख्या वाढविताना अॅपल पुरवठादार कंपन्यांमधील कामगारांची संख्या वाढत आहे. मेक इन इंडिया आणि देशातील उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजना जाहीर केले आहे. अॅपलचा पर्यावरस्नेही आयफोन १२ हा स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details