महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 22, 2020, 7:14 PM IST

ETV Bharat / business

एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांत 50 टक्क्यांनी कपात

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडियाच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे भत्ते 1 एप्रिल 2020 पासून कमी करण्यात येणार आहे. यामध्ये वैमानिकांना मिळणाऱ्या भत्त्याचाही समावेश आहे.

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली – कोरोना महामारीत भत्त्यांमधील कपातीला विरोध करण्याचे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न निष्पळ ठरले आहेत. एअर इंडियाने सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे भत्ते 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडियाच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांत कपात करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे भत्ते 1 एप्रिल 2020 पासून कमी करण्यात येणार आहे. यामध्ये वैमानिकांना मिळणाऱ्या भत्त्याचाही समावेश आहे.

सामान्य श्रेणीच्या अधिकाऱ्यांना मिळणारे वेतन आणि त्यासह मिळणारे भत्ते पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. मात्र, त्यांना मिळणाऱ्या भत्ते 50 टक्क्यांहून कमी होणार आहेत. सामान्य श्रेणीतील कर्मचारी आणि ऑपरेटर यांचे भत्ते हे 30 टक्क्यांहून कमी होणार आहेत. तर कायमस्वरुपी असलेले व कंत्राटी केब्रिन क्रू यांच्या भत्त्यांत 20 टक्क्यांहून अधिक कपात होणार आहे. कायमस्वरुपी आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 25 हजारांहून कमी असेल तर त्यांच्या भत्त्यात कपात होणार नाही.

करार पद्धतीने सेवेत असलेले वैमानिक आणि केब्रिन क्रू यांचे वेतन 25 हजारांहून अधिक असेल तर त्यांच्या भत्त्यात 50 टक्क्यांहून कपात होणार आहे. तर नियमित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 30 टक्क्यांची कपात होणार आहे.

कोरोनाच्या संकटात एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय सेवा ठप्प आहे. तर देशातील विमान वाहतूक सेवा मर्यादित प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कंपनीने कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध भत्त्यांत कपात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details