महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सणाच्या मुहुर्तावर एसबीआयकडून दुसऱ्यांदा कर्जाच्या व्याजदरात कपात

चालू आर्थिक वर्षात एसबीआयने तिसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. एमसीएलआरशी संलग्न असलेल्या कर्जाचा दर हा ८.२५ टक्क्यांवरून ८.१५ टक्के होणार आहे.

संपादित - एसबीआय बँक कर्ज

By

Published : Sep 9, 2019, 12:37 PM IST

मुंबई- सणाच्या मुहुर्तावर स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना पुन्हा एकदा खूशखबर दिली आहे. बँकेने कर्जाचे व्याजदर हे १० बेसिस पाँईटने कमी केले आहेत. त्याचबरोबर मुदत ठेवीवरील व्याजदर कमी केले आहेत.

चालू आर्थिक वर्षात एसबीआयने तिसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. एमसीएलआरशी संलग्न असलेल्या कर्जाचा दर हा ८.२५ टक्क्यांवरून ८.१५ टक्के होणार आहे.

सणाच्या मुहूर्तावर एसबीआयची ग्राहकांना खूशखबर, वाहन खरेदीवरील प्रक्रिया शुल्क माफ

किरकोळ मुदत ठेवीवरील व्याजदर हा २० ते २५ बेसिस पाँईटने कमी केला आहे. तर दीर्घावधीच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात १० ते २० बेसिस पाँईटने कपात केली आहे.

हेही वाचा-बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना खूशखबर ; सणाच्या मुहुर्तावर कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ

घटणारे व्याजदर आणि चलनाची अतिरिक्त उपलब्धता या कारणांनी मुदत ठेवीवरील व्याजदर कमी होत असल्याचे एसबीआयने म्हटले आहे. नव्या कर्जाचे व्याजदर हे मंगळवारपासून लागू होणार आहेत.

हेही वाचा-बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना खूशखबर.. कर्ज होणार स्वस्त

ABOUT THE AUTHOR

...view details