मुंबई- काही महिन्यांपूर्वी आर्थिक अनियमिततेमुळे पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बध लादल्यानंतर येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. मुंबईतील विविध परिसरातील येस बँकेच्या शाखा व एटीएमबाहेर खातेदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुलुंड पश्चिम एलबीएस रोडवरील शाखेबाहेरील ग्राहकांनीही अशीच गर्दी केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील येस बँकेवर गुरुवारी निर्बंध लागू केले. त्यामुळे अनेक ग्राहकांना फटका बसला आहे. ग्राहकांना केवळ 50,000 रुपये काढता येणार आहेत.
ग्राहक हवालदिल : मुलुंड येस बँकेबाहेर ग्राहकांची पैसे काढण्यासाठी गर्दी
भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील येस बँकेवर गुरुवारी निर्बंध लागू केले. त्यामुळे अनेक ग्राहकांना फटका बसला आहे. ग्राहकांना केवळ 50,000 रुपये काढता येणार आहेत.
आपल्या खात्यातील पैसे परत मिळतील का, याची भीती ग्राहकांना वाटू लागली आहे. दरम्यान रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे संचालक मंडळ 30 दिवसांसाठी बरखास्त केले आहे. भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
येस बँकेचे ग्राहक चंदन चोठरानी म्हणाले, येस बँकेत चालू खाते आहेत. बँकेतून केवळ 50 हजार रुपये काढता येणार आहेत. पीएमसी बँकेत सहा खाती आहेत. तेथेही अडचणींना सामारे जावे लागले आहे. पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही बँकांमध्ये पैसे ठेवतो. मात्र, बँकांमध्येच पैसे सुरक्षित राहिले नाहीत. त्यामुळे व्यापारीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.