दावोस- आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजब दावा केला आहे. अमेरिका हा विकसनशील देश असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) अमेरिकेला योग्य वागणूक देत नसल्याचा त्यांनी आरोपही केला. ते व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, डब्ल्यूटीओ ही अमेरिकेचा विकसनशील म्हणून विचार करत नाही. दुसरीकडे डब्ल्यूटीओ ही चीन आणि भारताचा विकसनशील म्हणून विचार करते. पुढे ते म्हणाले, डब्ल्यूटीओबाबत माझे काही मतभेद असल्याचे तुम्हाला माहीत आहे. कारण अमेरिकेला योग्य वागणूक दिली जात नाही, असे ट्रम्प म्हणाले.
हेही वाचा-ग्राहकांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर आणखी उतरले